विधानसभेचे विशेष अधिवेशन पुढं ढकललं! आता ‘या’ तारखेला होणार अधिवेशन

177 0

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, आता विधानसभेच्या या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.

मात्र आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी म्हणजेच रविवारी आणि सोमवारी पार पडणार आहे.

विधान सभेच्या विशेष अधिवेशनातच रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागेल.

विधासभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत असून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणी विधानसभेचा अध्यक्ष होणार की अन्य कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

 

Share This News
error: Content is protected !!