ब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्यामुळं ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

तेलंगणात राहुल गांधी अभिनेत्री पूनम कौरचा हात हातात धरून चालताना दिसल्यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी आणि पूनम कौर यांचा हातात हात धरलेला फोटो शेअर करत राहुल गांधी हे त्यांचे पणजोबा म्हणजे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, असं ट्विट केलं. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मात्र भाजप नेत्या प्रीती गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांना फटकारलं आणि त्यांना विकृत महिला, असं म्हटलं. राहुल गांधी खरोखरच त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाला एकत्र आणत आहेत, असं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी म्हटलं तर पवन खेरा यांनी, ‘तुम्हाला उपचारांची गरज आहे, तुमची मानसिक स्थिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हानिकारक ठरू शकते,’ असं म्हणत प्रीती गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.

आता प्रश्न हा उरतो की, राहुल गांधी यांनी अभिनेत्री पूनम कौरचा हात का धरला ? यावर मात्र स्वतः पूनम कौर यांनी उत्तर दिलंय. मी चालत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळणार तोच राहुल गांधींनी माझा हात धरला. भाजप नेत्या प्रीती गांधी यांच्या ट्विटलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. “हा पूर्णपणे अपमान आहे. लक्षात ठेवा, पंतप्रधान नारी शक्तीबद्दल बोलताहेत आणि आपण..? मी चालत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळणार तोच राहुल गांधींनी माझा हात पकडला. असो, सोशल मीडियावर मात्र या फोटोवरून राहुल गांधी चांगलेच ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं.