Eknath Shinde

Eknath Shinde: … तर एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होणार; कुणी केला दावा; वाचा सविस्तर

75 0

23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात 230 जागा जिंकत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाला तर एकट्या भाजपाला 133 इतक्या जागा मिळाल्या.

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असून मागच्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम असतानाच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पक्षनिरीक्षकांची निवड केली आहे.

4 डिसेंबर रोजी भाजपची गटनेते निवडले जाणार असून आता या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया? 

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते?

परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते.

४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले,

दाल मे कूछ काला है.

ते पत्रकार मला म्हणाले की भाजप चीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच . बाकी सगळे साफ .

तसेच होतांना दिसतंय

https://x.com/anjali_damania/status/1863635134043308183?s=19

Share This News
error: Content is protected !!