Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’

659 0

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं तसंच भरत गोगवलेंचा व्हीप अधिकृत असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदेंसोबत असलेले सगळे आमदार पात्र ठरले, याचसोबत अध्यक्षांनी भरत गोगवलेंनी दिलेल्या व्हीपमध्ये त्रुटी असल्याचं सांगत ठाकरेंच्या आमदारांनाही अपात्र केलं नाही. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. याचसोबत उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

या महापत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड केली जाईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच ठाकरेंच्या या महापत्रकार परिषदेला कायदेतज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरूवात होणार आहे. वरळीच्या डोम सभागृहात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide