उध्दव ठाकरेंशी पंगा घेणाऱ्या सुषमा अंधारेंच्या हाती शिवबंधन

206 0

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अडचणीच्या काळात त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे आज शिवबंधन बांधणार आहेत. 

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेभाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही सातत्याने निशाणा साधला होता.

Share This News
error: Content is protected !!