द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा; राहूल शेवाळे यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

326 0

मुंबई: आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्त्ववान महिला म्हणून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी  मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे.

 

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. असं देखील म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!