शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपदी निवड तर दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते

366 0

मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून या सुनावणीआधी शिंदे घटना मोठी खेळी खेळली असून उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली जुनी कार्यकारणी बरखास्त करून शिंदे गटाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.

या कार्यकारिणी मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असून आनंदराव अडसूळ,रामदास कदम यांची नेतेपदी तर तानाजी सावंत यशवंत जाधव गुलाबराव पाटील उदय सामंत यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले रामदास कदम हे कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून ते शिवसेनेचा कोकणचा स्वाभिमान आहे त्यामुळे त्यांची कोणी हकालपट्टी करू शकत नाही त्यांनी स्वतः शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

त्याच बरोबर सर्वच खासदार आमच्यासोबत सोबत आहे असं मला नेहमी वाटतं असं देखील दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!