Shilpa Bodkhe

Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

498 7

मुंबई : ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे (Shilpa Bodkhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.

शिल्पा बोडखेंनी केले होते ”हे आरोप
पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे असे आरोप शिल्पा बोडखे यांनी केले होते.

मुख्यमंत्री शिंदेंकडून पक्षात स्वागत
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना प्रा. बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!