SHASHIKANT SHINDE: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (ncp sp) प्रदेशाध्यक्षपदी माजी जलसंपदामंत्री विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे (SHASHIKANT SHINDE) यांची नियुक्ती करण्यात आली,
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या 25 व्या वर्धापन दिन कार्यक्रमातच जयंत पाटील (jayant patil) यांनी राजीनामा देण्याचे सुतोवाच केले होते.
त्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं अमोल कोल्हे निलेश लंके शशिकांत शिंदे यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती.
अखेर शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे
कोण आहेत शशिकांत शिंदे?
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगावचे असलेले शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात,
1999 मधून जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे पहिल्यांदा म्हणून विजयी झाले, राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांनी सांभाळले
असून सध्या विधान परिषदेतील मुख्य प्रतोद म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला
त्यानंतर 2024 मध्ये सातारा लोकसभेची निवडणूक ही शशिकांत शिंदे यांनी लढवली मात्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ते पराभूत झाले