पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा म्हणाले माझी…

3223 0

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसऱ्या भागाचे आज रोजी प्रकाशन झाले. त्यामुळे या पुस्तकात नेमक काय असेल , असे उत्सुकता सर्वाना होती.

पहाटेच्या शपथविधीबाबतदेखील शरद पवारांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. माझ्या संमतीनेच शपथविधी होत असल्याची समजूत करून देण्यात आली होती. त्याबाबत उद्धव ठाकरेंना फोन करून माहिती दिली होती. मुख्यमंत्री पदावरून सेनेत वादळ होईल, याची उद्धव ठाकरेंना कल्पना नव्हती. बंड शमविण्याआधी त्यांनी माघार घेतली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अजित पवार भावनाप्रधान आहेत. त्यामुळे भावनेच्या भरात त्यांनी निर्णय घेतला असावा.मात्र, ते पाऊल सरकार स्थापनेकडे होईल, असे वाटले नव्हते. सरकार स्थापनेबाबत काँग्रेसची भूमिका आडमुठेपणाची होती. त्यामुळे संयम ठेवणे अवघड होते, अस पवारांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. अजित पवारांचा मुद्दा हा कौटुंबिकदेखील होता. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे या विषयावर पडदा पडल्याची भूमिका पवारांनी पुस्तकात व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!