Sharad Pawar

Sharad Pawar Party New Symbol : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

699 0

शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक (Sharad Pawar Party New Symbol) आयोगाकडून नवे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला दिले आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टानं शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम ठेवतानाच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, गुरुवारी रात्री उशीरा निवडणूक आयोगानं पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह दिले.

Share This News
error: Content is protected !!