आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे यापैकीच परळी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बहिण-भवांमध्ये थेट लढत झाली होती 2014 ला धनंजय मुंडे यांचा पराभव करत पंकजा मुंडे विजयी झाले होत्या तर 2019 ला पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
मात्र 2024 ला महायुती म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानं धनंजय मुंडे विरोधात कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत असून धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी मराठा उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
परळी मतदारसंघातून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजेसाहेब देशमुख या नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहे. राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच ‘सिल्वर ओक’वर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.