मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी (oath ceremony) लवकरच होणार आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. मात्र पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपदं (ministers in Pune) मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच पुण्याला किमान सात ते आठ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
कुणाची नावं चर्चेत ?
पुण्यातील ज्येष्ठ नेत्यांपैकी माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, चंद्रकांत पाटील यांची नावं जवळपास निश्चित असल्याचा सांगितलं जात आहे. त्याबरोबरच भाजपच्या कोट्यातून राहुल कुल, माधुरी मिसाळ आणि महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून सुनील शेळके, दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. त्यामुळेच अशा पद्धतीने केवळ पुण्याला सात ते आठ मंत्रिपदं मिळू शकतात.
पुण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच
राज्यातील मंत्रिमंडळात मंत्रिपदाबरोबरच पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे. पण एकदा पुण्याचा पालकमंत्री पद भूषवलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुन्हा पालकमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे यंदा पुण्याचा पालकमंत्री पद भाजपला द्यावं, अशी मागणी भाजपच्या गोटातून होत आहे. भाजपकडून पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील या दोघांपैकी एका नेत्याला पुण्याचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
BJP MINISTERS LIST : भाजपची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर; ‘या’ नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
PUNE CRIME: ‘मी नगरसेवक आहे, मला तू आवडतेस’, असं म्हणत पुण्यातील महिलेचा विनयभंग
PUNE FIRING: एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राने केला गोळीबार; पुण्यातील धक्कादायक घटनेत नेमकं काय घडलं ?