ब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे फोटो पाहून भाजप खासदार म्हणाले खड्ड्यात गेली काँग्रेस; वाचा काय आहे प्रकरण?

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी आपलं इंग्लिश तर कधी महिला खासदारांसोबच्या सेल्फीमुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

त्यातच आता शशी थरुर यांना ट्विटरला शेअर केलेल्या फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कारण या सेल्फीत शशी थरुर यांनी कपड्यांवर उलटा तिरंगा लावल्याचं दिसत आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला असून नेटकरी टीका करत आहेत. फक्त सर्वसामान्यच नाही तर लडाखच्या भाजपा खासदारानेही या फोटोवरुन टोला लगावला आहे.

 

शशी थरुर यांनी ट्विटरला फोटो शेअर करताना, “इतर लोक सहभागी नसलेले सेल्फीही मी घेतले” असं म्हटलं होतं. मात्र यावेळी नेटकऱ्यांची नजर त्यांच्या जॅकेटवरील तिरंग्यावर गेली. शशी थरुर यांनी तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

लडाखचे भाजपा खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी तर तिरंगा योग्य पद्दतीत दाखवण्यासाठी शशी थरुर यांचा उलटा फोटो ट्विटरला पोस्ट केला. ‘तिरंगा सरळ असला पाहिजे, खड्ड्यात गेली काँग्रेस’ असं कॅप्शनही त्यांनी फोटोसोबत दिलं आहे.