SANTOSH BANGAR VISIT: राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचे मोठे (SANTOSH BANGAR VISIT) नुकसान झाले असून, त्यांना तातडीने पीक विमा आणि सरकारी मदतीची अपेक्षा आहे. मात्र पीक विमा कंपन्यांकडून होणारी दिरंगाई आणि मदत नाकारण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. याच पार्श्वभूमीवर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर थेट प्रशासनाला सोबत घेऊन एक आगळीवेगळी भेट दिली.
PUNE KOTHRUD: कोथरूड-बावधन भागातील नागरिकांना व्हायरल फ्लू; दूषित पाण्याची तपासणी
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी चिखली गावात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतातील नुकसानीचा आढावा घेतला. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी अगदी शेतकऱ्यांप्रमाणे (SANTOSH BANGAR VISIT) स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतात प्रवेश केला. चिखलातून वाट काढत ट्रॅक्टरवर त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी हे देखील होते. ही कृती त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांच्या समस्यांची प्रशासनाला थेट जाणीव करून देण्याच्या उद्देशाने केली.
PUNE KOTHRUD: कोथरूड-बावधन भागातील नागरिकांना व्हायरल फ्लू; दूषित पाण्याची तपासणी
या दौऱ्याचा मुख्य उद्देश विमा कंपनीच्या सोयाबीन पिक कापनी प्रयोगासाठी उपस्थिती लावणे हा होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर पीक विमा (SANTOSH BANGAR VISIT) कंपनीकडून योग्य पंचनामा न करता, चुकीचे निकष लावले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. आमदार बांगर यांनी या कृतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून दिली. पाऊस आणि पुरामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे.
आमदार बांगर हे यापूर्वीही पीक विमा कंपन्यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना शेतकऱ्यांचे हित पाहण्याचा आणि तातडीने योग्य पंचनामा करून मदत देण्याचा सज्जड इशारा दिला. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यास कार्यालये उद्ध्वस्त करू, असा कडक इशाराही त्यांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे.