द्रौपदी मुर्मू यांना राजकीय फायद्यासाठी पाठींबा दिला नाही तर….; संजय राऊतांनी सांगितलं मुर्मूना पाठींबादेण्यामागील कारण
मुंबई: राष्ट्रपतीपदाची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. येत्या १८ तारखेला निवडणूक पार पडणार आहे तर २१ तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप,एनडीए प्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत येणार असून त्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार खासदारांशी संवाद साधणार आहेत. द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का ? अशी चर्चा रंगली असतानाच संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की राष्ट्रपती पदासाठीसाठी द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा आहे. मुर्मू यांचा मातोश्रीवर भेटीचा कोणताही कार्यक्रम नसू योग्य व्यक्तीला आम्ही समर्थन केले आहे. कोणत्याही राजकीय फायद्यासाठी समर्थन केलेले नाही. महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी आदिवासी आहेत. आमचे शिवसेनेचे लोक देखील आदिवासी समाजामध्ये काम करत आहे त्यांनी देखील समर्थन दर्शवले आहे.
