मुंबई : महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांनी साद घातल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यावर ताबडतोब प्रतिसाद दिला आहे. मात्र, एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासमोर कुठल्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नाहीत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या मुद्यावरच हा साद-प्रतिसाद घडलेला आहे. दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यात वाद निर्माण करण्यासारखे काय? असा सवालही त्यांनी केला.