Sanjay Raut On Maratha Reservation : उदयनराजे, शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे ;संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

90 0

Sanjay Raut On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Sanjay Raut On Maratha Reservation)  यांचे आझाद मैदानावर उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असून राज्यभरातून आलेले हजारो आंदोलक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप व शिंदे सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे.

राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, “जे गृहमंत्री काश्मीरमध्ये कलम 370 हटवू शकतात ते मराठा समाजासाठी घटनेत बदल करू शकत नाहीत का?” असा थेट सवाल उपस्थित केला.

*TOP NEWS MARATHI SUPRIYA SULE MEET MANOJ JARANGE PATIL: खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट

शाह-शिंदेंवर आरोप (Sanjay Raut On Maratha Reservation) 

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असतानाही त्यांनी जरांगे पाटील यांना भेट दिली नाही, हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे राऊत म्हणाले. “मराठा बांधव हजारोंच्या संख्येने मुंबईत आले आहेत, पण शाह केवळ भाजपचा महापौर व्हावा एवढ्याचसाठी लालबागच्या राजाला प्रार्थना करत होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

शिंदे यांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, “अमित शाहांच्या मागे शेपटी हलवत फिरणे यांना शोभत नाही. मराठी माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी उभं राहण्याऐवजी ते दिल्लीच्या दबावाखाली आहेत.”

उदयनराजे व शिवेंद्रराजेंवर टीका

राऊतांनी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरही निशाणा साधला. “जर तुम्ही खरे मराठा असाल तर जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसा. पण दुर्दैवाने तुम्ही भाजपचे हस्तक बनला आहात,” अशी टीका त्यांनी केली.

CHAGAN BHUJABAL VS JARANGE PATIL : मोठी बातमी! छगन भुजबळ मैदानात, ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक; पडद्यामागे हालचालींना वेग

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आंदोलकांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. “अन्न, पाणी, निवारा यांची व्यवस्था करून आपण मराठा बांधवांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारवर गंभीर आरोप

“फडणवीस आणि शाहांचे सरकार हे मराठी लोकांना संपवण्याच्या कटात गुंतले आहे. हे बोलतात एक आणि करतात दुसरे. मराठी माणूस या लढाईत मागे हटणार नाही,” असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

Share This News
error: Content is protected !!