रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली. या बैठकीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड येथील गोळीबार मैदानावर सभा आयोजित केली आहे.
निवडणुक चिन्ह आणि शिवसेना नाव गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलचे सक्रीय झाले आहेत. त्यांची अलिकडेच खेड येथे जाहीर सभा पार पडली. त्या सभेत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.
तसेच त्यांची आता मालेगाव येथे २६ मार्चला विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.