काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन झालं असून ते 89 वर्षांचे होते धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे रोहिदास पाटील हे वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुलं मुली सुना आणि नातवंड असा परिवार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता. धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली.