पुणे : अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी एक कविता ट्विट करत शरद पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली आहे. तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच प्रश्न विचारतात…?, अशा शब्दांत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
रुपाली चाकणकरांनी नेमके काय ट्विट केले?
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
अशी कविता पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी