RSS PRANT SAMANVAY BAITHAK: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २० जुलैला पुण्यात प्रांत समन्वय बैठक पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक प्रांत समन्वय बैठक (RSS PRANT SAMANVAY BAITHAK) येत्या २० जुलै रोजी (रविवारी) पुण्यात पार पडणार आहे.

RSS PRANT SAMANVAY BAITHAK: पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होणार प्रांत समन्वय बैठक;’या’ विषयावर होणार चर्चा

338 0

RSS PRANT SAMANVAY BAITHAK: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २० जुलैला पुण्यात प्रांत समन्वय बैठक
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक प्रांत समन्वय बैठक (RSS PRANT SAMANVAY BAITHAK) येत्या २० जुलै रोजी (रविवारी) पुण्यात पार पडणार आहे.

RSS MOHAN BHAGWAT : ‘पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते, याचा अर्थ थांबावं असा होतो’

या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रांतातील विविध संघप्रेरित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, एकूण ५० संघटनांमधून सुमारे ४३४ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी दिली.

या बैठकीमध्ये संघाच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या सेवा,

आर्थिक, वैचारिक, सुरक्षा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांचे

संघटनात्मक कार्य, यावर चर्चा होणार आहे.
संघटनात्मकदृष्ट्या ही बैठक अत्यंत महत्त्वाची असते.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ
या बैठकीत प्रांत पातळीवर कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये आपापल्या क्षेत्रातील संघटनात्मक स्थिती,

संघ शताब्दीनिमित्तचे कार्यक्रम, पंच परिवर्तन या विषयावर चर्चा होईल.

विविध संघटनांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जाईल.
या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर,

RSS General Secretary Dattatreya Hosable : ‘RSS’ पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य केव्हा मिळणार ?

नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा व महिला कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे.
ही बैठक फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!