शेवटी मराठी माणसालाच…; ‘कॅग’च्या अहवालावरून रोहित पवारांचा मोठा दावा

956 0

नवी दिल्ली: नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासाच्या कामाचं सर्वत्र  कौतुक होताना पाहायला मिळतं. नितीन गडकरी हे राजकारणात अजातशत्रू व्यक्तीमत्व मानलं जातं. मात्र आलेल्या ‘कॅग’ अहवालावरून गडकरी सध्या अडचणीत आल्याचं पाहायला मिळत असून यावरून जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी…

केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही.
कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं. शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे. केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते.

असो! महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन!

Share This News
error: Content is protected !!