Praful Patel

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा! ईडीकडून जप्त केलेली 180 कोटींची मालमत्ता परत

1480 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असलेली त्यांची तब्बल 180 कोटींची मालमत्ता परत मिळणार आहे. SAFEMA अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्टच्या अपील न्यायाधिकरणाने ही संपत्ती परत करण्याचे आदेश दिले आहेत.PMLA कायद्यांतर्गत वरळीयेथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत जवळपास १८० कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर येते आहे. आता प्रफु्ल्ल पटेल यांच्या घरावरील EDची जप्ती उठली आहे.

ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गॅंगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप केला होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्द केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!