5 राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल ; बहुमतासाठी किती जागांची आहे आवश्यकता ? वाचा सविस्तर

117 0

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत.

बहुतांश ठिकाणी भाजपने  आघाडी घेतली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या जागांचे गणित वेगळे आहे. तसेच प्रत्येक राज्यातील बहुमताचा आकडाही वेगवेगळा आहे. कोणत्या राज्यात किती जागांसाठी बहुमत लागते सविस्तर समजून घ्या.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा आहेत. या राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान झाले. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणत्याही सरकार २०२ जागांची गरज आहे.

पंजाब

पंजाब हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे गेली वर्षभर हे राज्य चर्चेत राहिलं. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा असून बहुमतासाठी अवघ्या ५९ जागांची आवश्यकता आहे.

 

उत्तराखंड

पंजाबप्रमाणेच उत्तराखंडमध्येही बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. या राज्यात भाजप सत्ताधारी पक्ष आहे. पण भाजपला गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यावरून पक्षातील अंतर्गत कलह आणि राज्यातील अस्थिरता दिसून येते. ७० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी अवघ्या ३६ जागांची आवश्यकता आहे.

 

गोवा

गोवा हे सर्वात छोटं राज्य आहे. पण या राज्याने नेहमीच देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोव्यातील निवडणूक पूर्वीचं आणि निवडणुकीनंतरच समीकरण नेहमीच वेगळं असतं. त्रिशंकू विधानसभेत तर गोव्याची सर्वच समीकरणे बदलून जात असल्याचं पाहायला मिळतं. गोवा विधानसभेत ४० जागा आहे आणि बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे.

मणिपूर

गोव्यानंतर मणिपूरही छोटं राज्य आहे. मणिपूर विधानसभेत एकूण ६० जागा आहेत. पण बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एनपीएफ, एनपीपी आणि एलजीपीशी युती करून सरकार स्थापन केलं होतं.

Share This News

Related Post

#PUNE FIRE : मंगळवार पेठमध्ये फर्निचरच्या दुकानात आगीची घटना

Posted by - February 25, 2023 0
पुणे : मंगळवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौकानजीक फर्निचरच्या दुकानात आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली त्यानंतर…

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 1, 2022 0
सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याचे…
PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून…
Satara News

Satara News : पोहायला जाणे बेतले जीवावर! 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Satara News) काल 15 ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सुट्टी असल्याने…

पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

Posted by - September 29, 2022 0
पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *