लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं दिल्लीला रवाना

1362 0

नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता आलं असून आता देशात एनडीएच सरकार येणार असून त्या अनुषंगाने आज एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक राजधानी नवी दिल्लीत होणार असून या बैठकीसाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर  बावनकुळे व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दिल्लीमध्ये असून त्यांनी रात्री उशिरा भाजपा नेते अमित शाह यांची भेट घेतली आहे दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत सरकारमधून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती भाजपाच्या नेतृत्वाकडे केली होती त्या दृष्टिकोनातून ही भेट झाली आहे त्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आशिष शेलार दिल्लीकडे तात्काळ रवाना झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!