Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : शिवसंग्राम फाउंडेशनचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा

586 0

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे राष्ट्रीय काँगेस पक्षाकडून उमेदवार आहेत. आम्ही त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम अनेक वर्षे पाहात आहोत. 24 तासातील कोणत्याही वेळेस, कोणत्याही भागातील लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. शिवसंग्राम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेली 22/23 वर्षे “मराठा” समाजासाठी काम करतो. मराठा समाजाची अपेक्षा मराठा आमदार अथवा खासदारांची संख्या वाढवणे ही नसून मराठा समाजाचे प्रश्न सोडवतील, त्यांच्या पाठीशी थांबतील असे लोकप्रतिनिधी संसदेत पाठवणे ही आहे. आताही मराठा नेत्यांची, आमदार-खासदारांची संख्या कमी नाही. पण मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी समिती (SIT) नेमण्याच्या ठरावाला विरोध विधिमंडळाच्या दोनही सभागृहात एकाही मराठा आमदाराने केला नाही. जरांगे यांच्या विरोधातील SIT ला विरोध केला तो रवींद्र धंगेकर या एकमेव आमदाराने !

आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या अबाल-वृध्दांसह माता-भगिनींवर जो अमानुष लाठीहल्ला व गोळीबार झाला त्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा चेला आता “मराठा” उमेदवार म्हणून भाजपने दिला आहे. विद्यमान सरकारने मराठा समाजाला देऊ केलेले १०% आरक्षण हे फसवे व कोर्टात न टिकणारे आहे हे समाज जाणून आहे. मागे माजी न्या.एम.जी.गायकवाड आयोगाने दीड-दोन वर्षे, अनेक पातळ्यांवर सखोल सर्वेक्षण करून ३२०० पानांचा अहवाल सादर केला. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही तिथं हे १०० दिवसांच्या सर्वेक्षणावर, एका शासन निर्णय (GR) वर दिलेले १०% आरक्षण हे फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दिलेले गाजर आहे हे न समजण्या इतका मराठा समाज दुधखुळा नाही. मराठ्यांना जातीने नव्हे तर नीतीने मराठा असलेला खासदार हवा आहे. मराठा आया-बहिणींची फुटलेली डोकी, सांडलेलं रक्त समाज कदापि विसरू शकत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसंग्राम फाउंडेशनच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार श्री.रवींद्र धंगेकर यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा देत आहोत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime : पुण्यात गोल्ड हाईस्ट ! सराफाला बोलण्यात गुंतवून दागिने केले लंपास

Pune News : मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल ! शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणा-या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल सज्ज

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला

Murlidhar Mohol : गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा

Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!