RAVINDRA CHAVHAN VISITS PM MODI : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण (RAVINDRA CHAVHAN VISITS PM MODI) यांची ही पंतप्रधान मोदींशी पहिलीच भेट होती. यावेळी चव्हाण यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर केला. पंतप्रधान मोदींकडून पुढील कार्यासाठी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ALANDI NEWS : लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार ! आरोपीला धुळ्यातून केलं जेरबंद
संघटनात्मक कामाचा आढावा (RAVINDRA CHAVHAN VISITS PM MODI)
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला.
TOP NEWS MARATHI : मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांविरोधात नागरिक आक्रमक; आझाद मैदानावर ठिय्या
या पक्षकार्य अहवालात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून रविंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री. चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.