पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्या समोर झालेल्या आंदोलनात मस्तवाल पणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सातपुते म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे अशी वल्गना केली परंतु प्रत्यक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांनी नक्की महाविकास आघाडीची मानसिकता स्पष्ट झाली आहे हे कृत्य म्हणजे देशाचा अपमान आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड या विकृतावर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले की ज्यांच्या पक्षाचे नेते पदोपदी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावे राजकारण करत असतात त्यांच्या पक्षातील विकृत आमदारावर कथाकथित जाणते राजे कारवाई करणार का असा सवाल आमदार कांबळे यांनी केला. शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की जितेंद्र आव्हाड ही विकृती आहे ही विकृती भारतीय जनता पार्टी ठेचून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आव्हाड यांना पुण्याच्या अनुभव आहे त्यामुळे जर कारवाई झाली नाही तर जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा घाटे यांनी दिला.
यावेळी आमदार सुनील कांबळे, आमदार राम सातपुते शहराध्यक्ष धीरज घाटे, अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे, सरचिटणीस राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक दीपक पोटे,राजेश येनपुरे ,किरण कांबळे अतुल साळवे राजेंद्र काकडे गणेश यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Monsoon News : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?
Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल
Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल
Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?
Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन
HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं