राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र; पदाधिकारी मेळावा स्थगित

374 0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी  सकाळी दहा वाजता संवाद मेळावा आयोजित केला होता, पण आता हा मेळावा पावसामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.

१३ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होता. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीचं पत्र काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उद्या होणारा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही राज यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केली आहे.

अतिवृष्टीत लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. नदीकाठाला असलेल्या लोकांसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करावा असेही राज यांनी म्हटले. पूरस्थिती उद्भवल्यास वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी यंत्रणांवर कोणताही ताण येईल असे कोणतेही काम करू नका, असे आवाहनही राज यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!