नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे, असा खोचक टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, नांदेडमधील सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासांत २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली होती.
नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2023
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जात आहे, असे कळत आहे.