मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडवा मेळाव्याचा नवीन टीझर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नेमके काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थातच शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/OgImzXTSQX
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2024
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटाघाटी सुरु असतानाच राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन भाजप नेते अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र या भेटीगाठींना दोन आठवडे होऊन गेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात या टिझरची चर्चा रंगली आहे.
“9 तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे !” असं कॅप्शन देण्यात आल्यामुळे सर्वांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Archana Patil : चर्चेतील चेहरा : अर्चना पाटील
Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान
Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला
Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय
Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन
Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई
Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट