महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आज संपन्न झालं असून आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास आहे यावरचा ‘TOP NEWS मराठी’चा ‘स्पेशल रिपोर्ट’…
11 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेले राहुल नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
राहुल नार्वेकर यांची राजकीय सुरुवात ही शिवसेनेतून झाली असून शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुढं राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत 2014 ची लोकसभा निवडणूक मावळ मतदार संघातून लढवली मात्र यामध्ये 1,82,293 मतं मिळवत ते तिसऱ्या स्थानी राहिले होते. त्यानंतर त्यांना 2014 मध्येच विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं.
पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि वयाच्या 45 व्या वर्षी अध्यक्ष होत सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी मिळवला. यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा 48 हजार 581 मतांनी पराभव करत राहून नार्वेकर दुसऱ्यांदा कुलाबा मतदारसंघातून विजयी झाले. खरंतर राहुल नार्वेकर यांना कॅबिनेट मंत्रीपद हव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते मात्र त्यांची आता दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष ठरले आहेत.
अडीच वर्षात सर्वात चर्चेत असणारे अध्यक्ष
राज्यात अभूतपूर्व सत्तानाट्य घडल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय राहुल नार्वेकर यांनीच दिला होता त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात चर्चेत राहिलेले अध्यक्ष अशीही राहुल नार्वेकर यांची ओळख आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे राहुल नार्वेकर 18 वे अध्यक्षराहुल
राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अठराव्या अध्यक्ष ठरले असून गणेश माळवतकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते.
RAHUL NARVEKAR: विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकरांना संधी?