शिर्डी: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मागील 9 महिन्यात राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचं सरकार सत्तेत आहे.
मात्र आता भाजप नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच असल्याचं विखे पाटील विधान केलं आहे. यामुळे पुन्हा फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
या अगोदर सुद्धा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य केले होते.