महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाले असताना प्रचार वेगात आला असताना पूनम महाजन यांनी आपले वडील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या हत्येविषयी मोठं विधान केलं आहे.
प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर तब्बल 18 वर्षानंतर पूनम महाजन या सविस्तर बोलल्या आहेत.
प्रमोद महाजन यांची हत्या ही पैशासाठी किंवा मत्सरापोटी झाली नाही प्रमोद महाजन यांच्या हस्तेमागे कोणतेही कौटुंबिक कारण नसून हे मोठे षडयंत्र आहे असं पूनम महाजन म्हणाले आहेत.
झी 24 तासच्या कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी हे विधान केलं आहे.
२००६ मध्ये भाजप नेते आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन यांची त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली होती. प्रवीण महाजन यांनी २२ एप्रिल २००६ रोजी मुंबईतील वरळी येथील प्रमोद यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या.