मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 1 मे पासून ठिय्या आंदोनाचा निर्धार

1979 0

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून हा निर्णय म्हणजे केवळ राज्य सरकारचा वेळकाढूपणा आहे असं म्हणत सकल मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार शनिवारी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!