ब्रेकिंग न्यूजराजकारण

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील या नेत्यांचा झाला समावेश

कर्नाटक: 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

224 जागांसाठी मतदान होत असून भाजपा आणि काँग्रेस हे यांच्यामध्ये लढत होणार होत असून आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 51 नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रचारकांच्या यादीत प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.