मनसे फोडायचा विचार कराल तर…; उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीमागील ‘इनसाईड स्टोरी’

785 0

आजच्या दिवसाची सुरुवातच एका राजकीय बातमी निवडली आणि ती बातमी होती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी घेतलेली भेट

या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच ही भेट राजकीय नसल्याचं उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केला मराठी भाषा दिनानिमित्त व इतर काही विषयांवर राज ठाकरे यांच्याशी भेट झाली असं उदय सामंत म्हणाले आहेत मात्र आता या भेटीची पडद्यामागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात आहे. यात प्रामुख्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यासह काँग्रेसच्या काही जणांनी शिंदेंच्या शिवसेनेत ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत प्रवेश केला ‘ऑपरेशन टायगर’च्या निशाण्यावर राज ठाकरे यांची मनसे असल्याची माहिती कळताच उदय सामंत यांना ‘शिवतीर्थ’वरून बोलावणे धाडण्यात आले. त्यानंतर ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांचे कान टोचले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या काही जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. काही जणांना तर महामंडळ पदं देण्याचं आश्वासनही देण्यात आलं. तसेच, मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर यासंदर्भात एक महत्त्वाची बैठकही पार पडली होती.

Share This News
error: Content is protected !!