PMC GANESH BIDKAR: सकाळच्या प्रहरी जनसंवादाची वारी! गणेश बिडकरांचा ज्येष्ठ नागरिक, महिला अन् खेळाडूंशी थेट संवाद

273 0

PMC GANESH BIDKAR: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर (PMC GANESH BIDKAR) यांनी सोमवार पेठेतील शाहू उद्यान

येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.

या माध्यमातून त्यांनी प्रभागातील विविध समस्या ऐकून घेतल्या आणि भविष्यातील विकास योजनांबाबत रोडमॅप मांडला.

मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण,

अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत

, या दिशेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.

यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले.

मुरलीधर मोहोळ पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी; गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख

यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या महिला मतदारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत समाधान व्यक्त केले.

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शहरातील आणि प्रभागातील महिलांसाठी

आणखी विविध महिला-केंद्रित योजना राबवण्याचा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

PMC GANESH BIDKAR : आरोग्यसेवेसाठी मैलाचा दगड ठरणार कमला नेहरू रुग्णालय; गणेश बिडकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

याशिवाय, शाहू उद्यानात बॅडमिंटन सराव करणाऱ्या खेळाडूंशीही गणेश बिडकर यांनी संवाद साधला.

त्यांच्यासोबत काही वेळ खेळण्याचा आनंद लुटताना, प्रभागात खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे,

स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमात प्रभागातील इतर उमेदवार आणि स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते.

गणेश बिडकर यांच्या या सकाळच्या जनसंपर्क दौर्‍याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून,

प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे

PUNE BJP GANESH BIDKAR : विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!

Share This News
error: Content is protected !!