काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्नफेम अभिनेता पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी याला आरएसएसच्या गणवेशातील फोटोवरून जाहीररित्या फटकारले होते.
यानंतर काही दिवसांत पिट्याभाईने मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.
मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम .. असं लिहीत त्यांनीही पोस्ट केली आहे . त्यामुळे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे होतं अखेर रमेश परदेशी यांना भाजपमध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं यावेळी केंद्रीय नागरी व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजप महामंत्री राजेश पांडे यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते