ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई: 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित असून राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीला अद्याप मंजुरी दिली नाही.

मात्र आता या निवडीवरोधातच आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त कोट्यात कला, क्रीडा, साहित्यातील व्यक्ती हव्यात ॲड. आशिष गिरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.