… तरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं मोठं विधान

1662 0

पुणे: सकाळ माध्यम समूहानं घेतलेल्या ‘दिलखुलास दादा’  या प्रकट मुलाखतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेक किस्से सांगितले.

याच बरोबर 2004 मध्येच आमच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असतं तर आर आर पाटील यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता असं सांगतानाच 2024 कशाला आम्ही आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकतो असं म्हणत पवारांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली.

याच पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आले तर किंवा दहा वीस वर्षांनी त्यांना बहुमत मिळाले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. असे दानवे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!