काँग्रेसच ठरलं; ‘या’ दिवशी राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता

404 0

नुकतंच पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन संपन्न झालं.

आता लक्ष विधानसभा म्हणत भाजपाच्या प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सुमारे 5300 भाजपा पदाधिकाऱ्यांना यावेळी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप देण्यात आला.

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर आता भाजपाच्या अधिवेशनाला काँग्रेस देखील अधिवेशनानेच उत्तर देण्याची रणनीती आखत असल्याची माहिती समोर आली आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 20 ऑगस्ट रोजी मुंबई काँग्रेस अधिवेशन होणार असल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे देखील समोर आला आहे.

दरम्यान या अधिवेशनातून काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!