काल टीका आज भेट; सिल्व्हर ओकवरच्या छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीत काय झालं?

467 0

मुंबई: छगन भुजबळ यांनी कालच झालेल्या एका जाहीरसभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेवरून छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

त्यानंतर आता ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांची लवकर भेट होईल, असे सांगण्यात आले होते.

मात्र, तब्बल दीड तास त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना दीड तास वाटच पाहावी लागली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही भेट लांबली असल्याचं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या भेटीमागचं कारण उघड केलं आहे. राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी विनंती केल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!