२४ जुलैला रविकांत तुपकरांनी पुण्यात बोलावली राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

862 0

२४ जुलैला रविकांत तुपकरांनी पुण्यात बोलावली राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

राज्यस्तरीय बैठकीत ठरणार चळवळीची पुढील दिशा…बैठकीत होणार विचार मंथन

बुलढाणा (प्रतिनिधी ता.२१) – संपूर्ण राज्यभर आपले वेगळे वलय आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुणे येथे बुधवार २४ जुलै रोजी महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातील चळवळीतील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. येणारी विधानसभा निवडणूक पाहता ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण समजली जात असून या बैठकीत चळवळीची पुढील दिशा व राजकीय भूमिका यावर विचारमंथन होणार आहे. तर या बैठकीत नवी राजकीय घोषणा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण राज्याला परिचित आहे. शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केलेली आहे. चळवळीतील नव्या जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना त्यांनी आता एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच अनुषंगाने शेतकरी चळवळीतील पुढील आंदोलनात्मक व राजकीय दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी चळवळीतील प्रमुख महत्वाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक २४ जुलै रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांसोबत विचार मंथन व चर्चा करून शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी अपक्ष तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण राज्यातील सगळ्याच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नुकतीच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली होती. संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवायची,असा निर्धार करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. त्यानंतर आता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुणे येथे राज्यस्तरीय बैठक होऊ घातली आहे. राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत आता नेमकी आंदोलनाची घोषणा करतात की विधानसभेच्या दृष्टिकोनातून राज्यपातळीवर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!