आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

850 0

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब सहपरिवार शासकीय महापूजेसाठी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आदी नेते उपस्थित होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आहिरे परिवाराला पूजेचा मान मिळाला. बाळू अहिरे व आशाबाई अहिरे हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहेत.

Share This News
error: Content is protected !!