स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नो एन्ट्री! राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय

450 0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली मध्येच हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजकीय नेते व कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही

Share This News
error: Content is protected !!