Nitin Gadkari : नितीन गडकरींना भर सभेत आली चक्कर; Video आला समोर

499 0

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळेच बडे नेते प्रचारासाठी जोर लावत आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या उमेदवारासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषण सुरु असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

सभेच्या स्टेजवरच गडकरी पडल्यामुळे तिकडे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी आणि कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना उचललं आणि बाजूला नेलं, तसंच त्यांना पाणीही पाजलं. यानंतर नितीन गडकरींनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली. नितीन गडकरींना चक्कर येण्याची ही पहिलीच वेळ याअगोदरदेखील त्यांना चक्कर आली होती.

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यवतमाळच्या पुसदमध्ये आले होते. विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. दुपारी तापलेल्या उन्हामुळे गडकरींना भोवळ आली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून यवतमाळ-वाशिममध्ये संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vinod Patil : विनोद पाटलांची छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून माघार

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!