सध्याच्या सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरस (Influenza Virus) मोठ्या प्रमाणात पसरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजप खासदार निलेश राणे यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
नमस्कार,
१० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण…
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) September 13, 2023
काय म्हणाले निलेश राणे ?
भाजप खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये Influenza Virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (Lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही.” असे ते म्हणाले.
H3N2 ची लक्षणं काय?
ताप येणं
त्वचा उबदार आणि ओलसर होणं
चेहरा लाल होणंं
डोळे पाणावणं
सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी होणं