Nilesh Lanke

Nilesh Lanke : मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार निलेश लंके यांना प्रदान

605 0

पारनेर : स्वातंत्र सेनानी,जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय रेल्वे व अर्थ मंत्री मधु दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने माझी जबाबदारी वाढली असल्याचे सांगतानाच या पुरस्काराचे श्रेय मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना,दीन दुबळे, अंध, अपंग यांना आहे.माझ्या प्रत्येक कामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. हा पुरस्कार मी त्यांना समर्पीत करतो असे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले.

प्रा.मधु दंडवते जन्मशताब्दी महोत्सव समिती,स्नेहालय,रावसाहेब पटवर्धन स्मारक,राजमुद्रा अकादमी, मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ,पेमराज सारडा महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महासंघ आज, सोमवारी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. लंके यांना प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, संविधानाची प्रस्तावना आणि सकस वैचारीक पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मधू दंडवते यांचे चिरंजीव उदय दंडवते, साधाना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, विजयाताई चौहान, स्नेहालयच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड,श्याम असावा,हेरंब कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, दादाभाऊ कळमकर, शिवाजी नाईकवाडी, अभिषेक कळमकर, अ‍ॅड. राहुल झावरे, अर्जुन भालेकर, सरपंच राजेंद्र शिंदे, संदीप शिंदे, शिवाजी शिंदे, डॉ. बाळासाहेब कावरे, योगेश मते, भूषण शेलार, डॉ. सचिन औटी, अजय लामखडे, बाळासाहेब खिलारी, किसन रासकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, कै .मधु दंडवते यांनी आपल्या कामातून देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. दंडवते यांच्या विचारांची आजच्या राजकारणात, समाजकारणात खऱ्या अर्थाने गरज आहे. आजच्या राजकारणाची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आपण पाहतो. आजच्या राजकाण्यांनी दंडवते यांचे विचार आचारणात आणणे गरजेचे आहे. दंडवते मंत्री असतानाही रिक्षाने प्रवास करीत इतका साधेपणा त्यांनी आपल्या जीवनात जपला होता असे लंके म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!